विना नंबर प्लेटच्या हायवा दिंडोरीत सुसाट:अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे महसूल बुडाला
तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेक हायवा गाड्या चक्क विना नंबर प्लेट रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात…