Headlines

प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20 एकरातून 5 पोती बाजरी निघणे कठीण होते, तिथे सुभाष विठ्ठल गडगे हे प्रयोगशील शेतकरी आज 96 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. एकेकाळी कुटुंबासाठी ‘ड्रायव्हर’ म्हणून चाक फिरवणाऱ्या या हातांनी आज आधुनिक शेतीचे स्टिअरिंग इतके घट्ट पकडले…

Read More

नात्याला काळीमा:फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना सिल्लोड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. एका नराधम चुलत भावाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी मुलीला शेतात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर प्रथम…

Read More

डेक्कन क्वीनचा पुणे स्थानकावर 97 वा वाढदिवस साजरा:पुणे-मुंबईला जोडणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रेल्वेचे जंगी स्वागत

पुणे-मुंबईला जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेचा 97 वा वाढदिवस सोमवारी (1 जून) पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवस सोहळ्याचे नियोजन रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांनी केक कापून हा दिवस साजरा केला. सकाळी सव्वा…

Read More

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी:कामे वेगाने व दर्जेदार करण्याच्या बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना

सातारा येथील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच परिसर विकसित करण्याच्या रक्कम रुपये 132.95 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने करण्यासोबतच सर्व कामे दर्जेदार करा, दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नका,…

Read More

सावेडीत आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्सव:निसर्गाचा हुंकार ढोलगजर; टिपऱ्या-फुगड्यांच्या तालावर सांस्कृतिक जागर‎

अहिल्यानगर धावपळीच्या शहरी वातावरणात जेव्हा पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि टिपऱ्यांचा आवाज घुमला, तेव्हा सावेडीचा परिसर जणू अरण्यसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. आदिवासी सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळ्याने अहिल्यानगरकरांना एका समृद्ध वारशाची प्रचिती दिली. प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील आबालवृद्ध सहभागी झाले होते….

Read More

जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड:बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

जालन्यामध्ये हवामान व पर्जन्यमापनात एक अत्यंत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक उपकरणांमध्ये तब्बल चार वेळा छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसतानाही या यंत्रांवर चक्क बर्फाचे तुकडे ठेवून आणि उपकरणाच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवण्याचा हा गंभीर…

Read More

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि ‘सेवा’ संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या जाणाऱ्या या देखण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. 20 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 53 प्रमुख सारस पक्षी अधिवास क्षेत्रांमध्ये पहाटे 4:45 ते…

Read More

टरबूज पिकाचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतरच शेतकरी झाडावरून खाली उतरला, अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचे पत्र‎

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे विशेषत: टरबुजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात…

Read More

13 दिवसांत फुटली 28 वर्षे जुनी TMC:दिल्लीतून सुरू झाला बंडाचा खेळ, 58 आमदार वेगळे; शुभेंदूंच्या बैठकीत ममतांचे जवळचे लोक पोहोचले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) ला पक्ष स्थापनेच्या २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच फुटीचा सामना करावा लागला आहे. TMCच्या ८० पैकी ५८ बंडखोर आमदारांनी बुधवारी ममता बॅनर्जी यांच्या जागी रितब्रत बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले. अध्यक्षांनी या दाव्याला मंजुरीही दिली. बंडाचे संपूर्ण नाट्य २२ मे रोजी दिल्लीतील बंग भवनात TMC आमदार रितब्रत बॅनर्जी आणि मुख्यमंत्री…

Read More

रायगड किल्ला विकासकामांचा आशिष शेलार यांनी घेतला आढावा:सर्व विभागांना संयुक्त स्थळ पाहणीचे निर्देश, संवर्धन कामांना गती देण्याच्या सूचना

रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे…

Read More