पिळकोसच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड:संभाव्य तणावाची शक्यता टळली; गावात जल्लोष
तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच मधुकर जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी दोन सदस्य इच्छुक असल्याने दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव, मोहन वाघ आणि…