आता असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य
येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे…