नागपूरमध्ये नाले-नदी सफाईवर 34 कोटींचा खर्च:तरीही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी साचते पाणी, RTI मधून माहिती समोर
नागपूर महानगरपालिकेने गेल्या चार ते पाच वर्षांत नाले आणि नद्यांच्या सफाईवर तब्बल 34 कोटी 48 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचणे आणि नाले तुंबण्याच्या घटनांमुळे मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मनपाच्या…