मराठवाड्यात कुणबी जातपडताळणीचे 61 अर्ज अवैध:समितीच्या स्थापनेनंतर 15,597 अर्ज ठरले वैध
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी वकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रपडताळणी प्रक्रियेत न्या. संदीप शिंदे समिती स्थापनेनंतर ३१ जुलै २०२६ अखेरपर्यंत एकूण ६१ अर्ज पडताळणी समित्यांनी अवैध (नामंजूर) ठरवले आहेत. याच कालावधीत विभागातील १५,५९७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यातआली आहेत. शासकीय आकडेवारीनुसार,न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मराठवाड्यातील आतापर्यंतच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जातपडताळणीसाठीचे एकूण २०,१४३…