Headlines

दिव्य मराठी एक्स्पाेज:नाशिकमध्ये आमदार बंधूंच्या कॉलेजसाठी वळवला दलित वस्ती योजनेचा 10 कोटींचा रस्ता, महापालिकेच्या आशीर्वादाने भ्रष्टाचाराला सोयीस्कर वाट

दलित वस्ती सुधार योजनेच्या नावाखाली तब्बल 10 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीचा मोठा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1 मधील वस्त्यांसाठी मंजूर झालेला हा निधी मूळ लाभार्थ्यांना डावलून चक्क आमदार दराडे यांचे बंधू रामदास दराडे यांच्या कॉलेजपर्यंत तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने स्वतःचेच नियम धाब्यावर बसवून ही बेकायदेशीर कृती केल्याने…

Read More

EDने कोलकाता पोलिसांच्या DCPला अटक केली:चौकशीसाठी हजर न राहिल्याचा आरोप; TMC कार्यालयावर बुलडोझर चालवला

ईडीने कोलकाता पोलिसांचे डीसीपी शांतनु सिन्हा घोष यांना अटक केली आहे. त्यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते हजर होत नव्हते, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध लुक-आउट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. त्यांची अटक सोना पप्पू प्रकरणात चौकशीदरम्यान झाली. हे प्रकरण कोलकातामध्ये जमीन हडपणे, खंडणी आणि रिअल इस्टेटशी संबंधित मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित आहे. दरम्यान,…

Read More

पुणे विषारी दारू बळी:तब्बल 21 जणांच्या मृत्यू प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीवर 'मोक्का' अंतर्गत सीआयडीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील हडपसर, दापोडी आणि फुरसुंगी परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे 21 जणांच्या मृत्यू प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळाली आहे. सीआयडीच्या तपासात, दत्ता ऊर्फ भाऊ…

Read More

चिखलदऱ्यात पर्यटनाचा पहिला विकेंड; सुरक्षेसाठी 200 पोलिस:धोकादायक सेल्फी आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार करडी नजर

14 दुचाकीद्वारे राहणार सतत गस्त‎ . विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरम्यान पावसाळ्यातील शासकिय सुटी व विकेंड अर्थात शनिवारी, रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. यातच चिखलदरा व परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ व ५ जुलै हा पहिलाच विकेंड आहे. यातच चिखलदरा येथे मागील काही तासांपासून सुरू असलेला सततधार पाऊस…

Read More

बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा:ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या घरात शिरला, अश्लील मागणी केल्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

विठूरायाच्या जयघोषाने दुमदुमला शाळेचा परिसर:बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत, विद्यार्थ्यांची उपस्थिती‎

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांची दिमाखदार उंचावलेली पताका आणि “जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड…

Read More

'ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नाहीत':'खिशात पावडर' टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या बचावासाठी तरुण सरसावला

“खिशात 50 ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या घटनेवेळी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन तरुणांपैकी एकाने पुढे येत या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणली असून, “ते पोलिस काका वाटतात…

Read More

18 गावांतील मालमत्ताधारकांना 7/12 ऐवजी पीआर कार्ड मिळणार:शासनाच्या अध्यादेशाची छत्रपती संभाजीनगर मनपा करणार अंमलबजावणी

शहरातील वाढीव हद्दीतील आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) नसलेल्या मालमत्ताधारकांचे लवकरच सर्वेक्षण होणार आहे. त्यांना मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 उताऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या उताऱ्यांची जागा आता अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया केली…

Read More

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग:विष्णुपुरीतील थरारक VIDEO समोर; दोन विद्यार्थिनी जखमी

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे…

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:हा सरकारी तिजोरीचा अपहार, योजना राबावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संजय राऊत

महाराष्ट्रात गाजलेली लाडकी बहीण योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. संजय राऊत म्हणाले, साधारण…

Read More