Headlines

बालविकास, महिला सक्षमीकरणात प्रत्येकाचे योगदान गरजेचे:अमृता फडणवीस यांचे ग्रॅव्हिट्स ऊर्जा पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

अमृता फडणवीस यांनी बालविकास आणि महिला सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले आणि पर्यावरणासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ…

Read More

अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन‎

शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन, 7 मजूर ठार:20 अजूनही अडकलेत; ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचाव करणारे काही कामगारही बेशुद्ध

सिक्कीममध्ये सोमवारी एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले. त्यामुळे आत असलेले 27 मजूर अडकले. यापैकी 7 मजुरांचा मृत्यू झाला असून, 20 मजूर अजूनही अडकले आहेत. नामची जिल्ह्यातील मामरिंग येथे असलेल्या समरदुंग बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी अनुपा तामलिंग यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांची नेमकी संख्या 27 पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते….

Read More

मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर विकण्यासाठी जगाला स्क्रीनला चिकटवले:सीईओ श्रीनिवास यांचा दावा – ‘बिल गेट्सनी जगाला 9-5 च्या नोकरीत अडकवले

तुम्हीही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगणकासमोर बसून डेस्क जॉब करता का? जर होय, तर परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचा दावा तुम्हाला धक्का देऊ शकतो. श्रीनिवास म्हणतात की हा ९ ते ५ चा डेस्क जॉब मानवी कामाची नैसर्गिक उत्क्रांती नाही, तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी तयार केलेली एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक रणनीती…

Read More

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकाॅप्टरचे वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग:हवेत 20 मिनिटे हेलकाव्यानंतर वैमानिकाचे प्रसंगावधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळात सापडले. ते महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडकडे ते ओएसडींसह एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. मात्र, खराब हवामान व ‘झीरो व्हिजिबिलिटी’मुळे त्यांचे हेलिकॉप्टर तब्बल २० मिनिटे हवेत हेलकावे होते. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘एटीसी’ शी संपर्क साधला आणि तातडीने मार्ग बदलून हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर सुरक्षित उतरवले….

Read More

हिंगोली नगरपरिषदेकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम:अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून बुधवारी ता. १९ सकाळी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. औंढा रोड भागात अवघ्या दोन तासात परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरीकांनीही या अभियानात सहभागी होऊन आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सर्व प्रभागातील कचरा घंटागाडीच्या…

Read More

Sengaon Kolsha College Assault Case; President Booked For Attacking Parent

सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे बी फार्मसी महाविद्यालयात मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संस्थाध्यक्षासह तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १३ गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील पोटा येथील गजानन जाधव यांची मुलगी अंजली ही सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर बी फार्मसी…

Read More

बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला आली होती:3 कोटी रुपयांना आलिशान रिसॉर्ट बुक केले होते, केतनसोबत इथेच लग्न करण्याचा हट्ट केला होता

पुणे (महाराष्ट्र) येथील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरी (23) सोबत उदयपूरलाही आली होती. सियाला सरोवरांचे शहर उदयपूरची सुंदरता इतकी आवडली होती की तिने केतन अग्रवालसोबत उदयपूरमध्येच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. सियाचा हाच हट्ट आणि तिचे म्हणणे मान्य करून केतनने उदयपूरमधील प्रसिद्ध ‘अनंता रिसॉर्ट’ला डेस्टिनेशन वेडिंगसाठी निश्चित केले होते….

Read More

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने…

Read More

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या कारागृहातून पसार:भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता

येरवडा येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More