Headlines

उत्तर महाराष्ट्रात धरणीकंप!:नाशिकच्या सुरगाण्यात एकापाठोपाठ भूकंपाचे 4 धक्के, पालघरही हादरले; घरांना तडे गेल्याने नागरिक दहशतीखाली

उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या भागात पुन्हा एकदा निसर्गाने नागरिकांची झोप उडवली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका आणि पालघरचा डहाणू-तलासरी पट्टा शुक्रवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वारंवार बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. नाशिक: बोरगावात सलग चार हादरे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि लगतच्या परिसरात…

Read More

देहूत महिला महापौरांच्या हस्ते वटवृक्ष लागवड:पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी, 'निर्मल वारी हरित वारी' अभियानाचा भाग

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वचनाचा वारसा जपत, यंदाची वटपौर्णिमा श्रीक्षेत्र देहू येथे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत ‘सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे वटवृक्ष लागवड आणि पूजन सोहळ्याचे…

Read More

कारच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या:अपघात नव्हे हा तर घातपात, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप‎

राहाता शहरातील १३ वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले असून हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी मृतदेह थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

‘Vantara University’ dedicated to wildlife and veterinary science launched, world’s first integrated global university in Jamnagar

Marathi News National ‘Vantara University’ Dedicated To Wildlife And Veterinary Science Launched, World’s First Integrated Global University In Jamnagar जामनगर12 तासांपूर्वी कॉपी लिंक रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांची जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था, ‘वनतारा’ ने जामनगरमध्ये ‘वनतारा युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची घोषणा केली. वन्यजीव संरक्षण व पशुवैद्यकीय शास्त्र यांना समर्पित ही जगातील पहिले एकात्मिक जागतिक…

Read More

माती-पाणी संवर्धनासाठी हजारो नागरिक चालले:छत्रपती संभाजीनगरमध्ये महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. ‘माती आणि पाणी’ संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या मार्गावर ही जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत १५ तारखेपासून मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती मोहीम…

Read More

वरळीतील जनआक्रोश मोर्चा भाजपच्या अंगलट:नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटी-शर्तींच्या पायमल्लीचा ठपका

लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा…

Read More

लखनऊ आग- मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध:बहीण जोरजोरात रडली, अनेक मुलांनी घरी शेवटचा कॉल केला; 7 तासांत 15 शवविच्छेदन

लखनऊ कोचिंग अग्निकांडात जीव गमावलेल्या 15 लोकांचे सोमवारी रात्री उशिरा सुमारे 7 तास पोस्टमॉर्टम चालले. अपघातानंतर लगेचच मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सुरू करण्यात आले. यावेळी मृतदेहांमधून बाहेर आलेले रक्त गटारातून वाहून बाहेर आले. हे पाहून तिथे उपस्थित असलेले कुटुंबीय घाबरले आणि रडू लागले. मुलगा नीलेशचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. बहीण मोठ्याने ओरडून रडू लागली. मग स्ट्रेचरवर…

Read More

खड्ड्यांमुळे अमरावतीकरांचा जीव टांगणीला:मान्सूनपूर्व नियोजन आणि पॅचवर्कच्या कामात उणीवा उघड

अमरावती शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी उघड झाल्या असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्ल्यांपर्यंत सर्वत्र खड्डे पडले आहेत. राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर, रेडीयंट हॉस्पीटलसमोरील रस्ता, मोतीनगर ते राजेंद्र कॉलनीचा रस्ता आणि डी मार्टजवळील साईनगरकडे जाणारे वळण यांसारख्या…

Read More

सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले:जेपी नड्डा रात्री 12.30 वा मेदांतात पोहोचले, ज्युस पाजले; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषणावर होते

सोनम वांगचुक यांनी 27व्या दिवशी उपोषण संपवले आहे. गुरुवारी रात्री उशिरा गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण सोडले. 21 जुलै रोजी त्यांना सफदरजंग येथून मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयातून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही मंत्री त्यांना कपमधून पहिला घोट पाजताना दिसले. वृत्तानुसार,…

Read More