Headlines

झारखंडमधील सिमेंट फॅक्टरीत स्फोट, 3 अभियंत्यांचा मृत्यू:युनिट इन्चार्जचा आरोप- ओव्हरहिटिंगमुळे अपघात, अनेक वेळा AC लावण्यास सांगितले होते

झारखंडमधील रामगढच्या बरकाकाना येथील मा छिन्नमस्तिका सिमेंट अँड इस्पात फॅक्टरीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. फॅक्टरीमध्ये काम करत असताना अचानक टर्बाइनचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की प्लांटमध्ये भीषण आग लागली. या अपघातात 3 अभियंत्यांचा भाजून मृत्यू झाला. एक मजूर गंभीर जखमी झाला. मृतकांची ओळख रांची येथील संजीव कुमार केसरी (50), बोकारो येथील…

Read More

युद्धामुळे डिझेल दर भडकले; ट्रॅक्टर मशागतीच्या खर्चात 25 टक्के वाढ:लांबलेला पाऊस, वाढत्या खर्चामुळे 60% शेतकऱ्यांनी मशागतच केली नाही सुरू

अमेरिका – इराण युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याने डिझेलच्या किमतीत थेट १० टक्क्यांनी वाढ झाली. ३ महिन्यापूर्वी ९०.७६ रुपये प्रतिलिटर असणारे डिझेल जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे ९८.५६ रुपयावर पोहोचले. डिझेलमधील या दरवाढीचा थेट परिणाम आता कृषी क्षेत्रावर दिसू लागला असून ट्रॅक्टर मालकांनी शेतीच्या मशागतीच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या…

Read More

मंत्री अदिती तटकरेंचा खासगी सचिव वादात:महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलण्याचा अन् बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, स्वतः अदिती तटकरेही यामु्ळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे…

Read More

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts

Marathi News National Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस…

Read More

जिल्ह्यात एकूण 27 हजार 375 सौर कृषी पंप,वीज लपंडावापासून सुटका:तालुक्यात 5 हजार 383 शेतकऱ्यांना सौरचा आधार, रात्रपाळीची गरज नाही‎

जिल्ह्यात एकूण २७ हजार ३७५ सौर कृषी पंप उभारण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पैठण तालुक्यात आतापर्यंत ५ हजार ३८३ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत. तर वैजापूरमध्ये ५ हजार ३७९, गंगापूरमध्ये ४ हजार ९८४, सिल्लोडमध्ये ४ हजार ८५१, कन्नडमध्य . सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जा कृषी पंप व्यवस्था केल्याने उन्हाळ्यात विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी…

Read More

वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात होणार साजरी:बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांचा उत्सव

छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेरूळमध्ये भीम सैनिक मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करत जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वेरूळमध्ये मोठा बॅनर उभारण्यात आला. बॅनर ओपनिंग सोहळा डीजेच्या गजरात…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:20 हजार उधारी फेडण्यासाठी हॅकिंगचे ट्रेनिंग देऊन काढली 25 हजार खोटी जन्म प्रमाणपत्रे

अवघ्या २० हजार रुपयांच्या उधारीपायी महाराष्ट्रात तब्बल २५ हजार बोगस नागरिकांचा जन्म झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत देता येत नसल्याने एका मास्टरमाइंडने आपल्या मित्राला थेट राज्य शासनाचे सीआरएस (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम) पोर्टल हॅक करण्याचे प्रशिक्षण दिले. ठाणे, यवतमाळ, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या ४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे पोर्टल हॅक करून सुमारे २५ हजार…

Read More

हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाईसाठी लय सापडेना:56 हजारांचा गुटखा पकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न, कार्यालयाच्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बेफामपणे गुटखा विक्री होत असतांना अन्न औषध प्रशासनाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात होते. हिंगोली येऊन भेटीची औपचारीकता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची लय सापडलीच नाही. त्यानंतर आता सचिव तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वसमत येथे छापा टाकून ५६ हजाराचा गुटखा पकडत स्वतःची पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न केला ओह. तर दुसरीकडे…

Read More

नाबार्डचा 45 वा स्थापना दिन साजरा:महिला शेतकऱ्यांचा गौरव, महाराष्ट्रात विक्रमी ₹39,380 कोटींचे सहाय्य, ग्रामीण विकासावर भर

नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचा ४५ वा स्थापना दिन गुरुवारी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष–२०२६ च्या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी, महिला-प्रवर्तित शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्वयं-सहाय्यता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संभाजीनगरात महामोर्चा:विभागीय आयुक्तालय ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता आज मोर्चामुळे बंद

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, बुधवारी (12 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिपब्लिकन सेना’चे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात तब्बल 50 हजार ते 1 लाख भीमसैनिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 600 हून अधिक पोलिसांचा…

Read More