पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत
साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा…