Headlines

'तुकाराम मुंढे पॅटर्न'चा धसका!:सेनगावमध्ये 'एफडीए'ची धाड पडताच व्यापाऱ्यांनी दुकाने केली बंद; अधिकारी रिकाम्या हाताने परतले

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यासाठी आलेले अन्न व आवश्यक प्रशासनाचे अधिकारी गुरुवारी ता १८ दाखल झाले. मात्र एकही नमुना न घेता अधिकाऱ्याचे पथक रिकाम्या हाताने परत गेले आहे. या प्रकाराची सेनगावमध्ये चांगली चर्चा सुरू होती. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाचे…

Read More

'प्रॉप कनेक्ट 2026' राष्ट्रीय परिषद पुण्यात:देशभरातील रियल्टर्स, विकसक सहभागी होणार; 'प्रॉप'चे आयोजन

पुण्यात ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या राष्ट्रीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट येथे होणार आहे. या एकदिवसीय परिषदेत देशभरातील ३८ शहरांमधील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून…

Read More

डीजे-दणदणाट संस्कृतीला शोभत नाही:लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळकांचा मंडळांना स्पष्ट संदेश; उत्सवाला गालबोट लागेल असे काही करू नका!

गणेशोत्सवाची परंपरा सुरू करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी आज गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप आणि वाढत्या डीजे संस्कृतीवर परखड मत व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना समाज संघटन होती, मात्र आजकाल आवाजाची मर्यादा ओलांडून लावले जाणारे डीजे आणि त्यावरील दणदणाट हा आपल्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. डीजे आणि…

Read More

अंधेरीत एसआरए इमारतीला भीषण आग:जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड, तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या

अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीतीने काही हताश रहिवाशांनी चक्क तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून,…

Read More

'उर्फी जावेदने घेतले होते ₹1 लाख':CJP आंदोलनासंदर्भात इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीचा दावा, हल्ल्यासंदर्भात दीपकेंविरोधात तक्रार केली

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने यानी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याने दावा केला की दीपके यांच्याशी संबंधित लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याचबरोबर, त्याने उर्फी जावेदवर 1 लाख रुपये आणि पूनम पांडेवर 20 हजार रुपये घेतल्याचाही आरोप केला. न्यूज एजन्सी ANI शी…

Read More

मेहकरमध्ये जुलूस उत्साहात; सामाजिक सलोख्याचा संदेश:धार्मिक घोषणांनी दुमदुमले शहर; शांततेत झाला समारोप‎

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मेहकर शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्साह आणि धार्मिक भावना व्यक्त केली. जुलूसच्या मार्गावर करण्यात आलेली आकर्षक सजावट, हिरवे झेंडे, धार्मिक संदेश आणि विद्युत रोषणाई मुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सदर उत्सव २६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणुकीतील प्रेम, शांतता, बंधुभाव आणि…

Read More

​'भंडारा-गोंदिया'त अखेरच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा:काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात, नाना पटोलेंचा 'डबल गेम' की अंतर्गत धुसफूस?​

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवशी भंडारा-गोंदिया मतदारसंघात अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच, महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसने राजकीय पंडितांना चक्रावून टाकणारी खेळी खेळली आहे. काँग्रेसकडून अर्जुनी/मोरगावचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग

कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा…

Read More

लखनऊ कोचिंग अग्निकांडावर संतापले सेलेब्स:अग्निहोत्री म्हणाले- मृत्यूचा खेळ, पुढचा नंबर कोणाचा; देवोलीना म्हणाली- हायवे नको, कुटुंबाची सुरक्षा हवी

लखनऊमधील 2 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याच दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध करत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य यांनी या अग्नितांडवावर संताप व्यक्त करत लिहिले, ‘सत्ता एक धोकादायक व्यसन आहे. ती चांगल्या हेतू असलेल्या नेत्यांनाही ज्यांची सेवा…

Read More