जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये….