राज्यातील 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. माधवी खोडे-चवरे मंत्रालयात सचिवपदी, तर आदित्य जिवने जळगावचे नवे मनपा आयुक्त
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी प्रशासकीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, याअंतर्गत नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून…