Headlines

अनंत अंबानींचा 31वा वाढदिवस-जामनगरच्या सर्व गावांना भोज:1 लाख गायींना छप्पन भोग; शाहरुख-रणवीरसह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग, PHOTOS

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र, अनंत अंबानी, आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगाचे औचित्य साधून, गुजरातमधील जामनगर येथे एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे; ज्यामध्ये उद्योगजगतातील अनेक नामवंत व्यक्ती—तसेच बॉलिवूडमधील तारे-तारका—सहभागी होण्यासाठी आधीच दाखल झाले आहेत. गुरुवारी, अनंत यांनी जामनगर येथे ‘गो-सेवा’ (गायींची सेवा) केली. त्यांनी १,००,००० हून…

Read More

राज्यात एआय, 5-जीमध्ये 4,080 कोटींची गुंतवणूक:पुणे, रायगडमध्ये प्रकल्प, 4750 रोजगार मिळणार

महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ४,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ४,७५० तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. राज्य सरकारला…

Read More

रोहित पवारांचा PM मोदींना टोला:पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतके जगात कुणीही माहीर नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री…

Read More

पहिल्या टप्प्यात 37.52 लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू:पशुसंवर्धन आयुक्तांचे लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे आवाहन

राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २०२६-२७ वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे जिल्हानिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे…

Read More

काँक्रीटच्या जंगलामुळे चिमण्यांचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर:‘वाडा संस्कृती’सोबत पाखरेही झाली पोरकी, अहिल्यानगर शहरातील चिवचिवाट हरवला

प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराचा वेगाने विस्तार होत असून जुन्या वाड्यांची जागा टोलेजंग अपार्टमेंट्स आणि फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. मात्र, या सिमेंटच्या जंगलात प्रगती साधली जात असली, तरी निसर्गाचा अविभाज्य भाग असलेली ‘चिमणी’ मात्र शहरातून हद्दपार होताना दिसत आहे. कधीकाळी अंगणात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आता शहराच्या गजबजाटातून दूर जात ग्रामीण भागाकडे स्थलांतरीत झाल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले…

Read More

येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत‎

राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:मनीषा हवालदारने 'गॉड' नावाने सेव्ह केलेला नंबर विद्यार्थ्याचा, सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केलेली एनटीए पॅनेलवरील ‘फिजिक्स’ची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात समोर…

Read More

करमाळ्याच्या खातगाव जि.प. शाळेने उभे केले ‘हरित मॉडेल’:प्लॅस्टिक गोळा करून रोपवाटिका, शिक्षकांच्या जिद्दीमुळे गावागावांत पर्यावरण क्रांती‎

केवळ ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करून किंवा त्या दिवसापुरतेच निसर्गाविषयी वर्तन ठेवून आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. वर्षभर पर्यावरण संवर्धनाबाबत पोषक पद्धतीने वागणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे, हाच नवा दृष्टिकोन या श . निसर्गाच्या सानिध्यातून शिक्षणाची सुरुवात कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव…

Read More

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हा . या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे…

Read More

सरकारने शब्द पाळला नाही तर असंतोषाचा भडका उडेल:एकदा मुंबईत उपोषणाला बसलो तर उठणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीकविम्यासह इतर २३ मागण्यांसाठी तीव्र अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, शरीराने साथ सोडलेली असतानाही तुपकरांचा बाणा कायम असून, त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. “सरकारने कर्जमाफीच्या निकषांबाबत दिलेला शब्द पाळला नाही, तर…

Read More