Headlines

गुन्हेगारी थांबवता येईना अन् गरिबांचे धंदे बंद करताय:पुण्यात रात्री 10 नंतर दुकानबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस प्रशासनाने लागू केलेल्या रात्रीच्या निर्बंधांवरून सरकार आणि प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला आहे. पुण्यात चौदा दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत, 24 तास धावणाऱ्या या शहरात…

Read More

Thackeray Meeting Missed by 4 MLAs; Operation Tiger Buzz

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन . शिवालयात ठाकरेंची आमदारांसोबत महत्त्वाची बैठक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची बैठक घेतली. अधिवेशनादरम्यान पक्षाची भूमिका,…

Read More

खत बुकिंगच्या नव्या ॲपने शेतकऱ्यांची‎झाली डोकेदुखी:खत वितरण विस्कळीत‎, ॲप तत्काळ बंद करण्याची खासदार संदिपान भुमरे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी‎

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खत वितरण प्रक्रियेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ॲपमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खत बुकिंगसाठी कृषी विभागाने लागू केलेल्या या नव्या प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद . खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी वेळेत खते उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना नव्या ॲपमधील…

Read More

आत्मविश्वास:सोशल मीडियाला ‘नो'', पण युट्युबचा केला ‘स्मार्ट'' वापर‎, अंजनगावच्या रिद्धीने गाठलं दहावीच्या परीक्षेत 100 टक्क्यांचे शिखर

“मी कधीही रात्र रात्रभर जागून किंवा पहाटे उठून तासनतास अभ्यासही केला नाही. मात्र, जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. तसेच आज इतक्यावेळात इतका अभ्यास पुर्ण करायचाच, असे स्वतःलाच चॅलेंज द्यायची आणि ते पूर्णही करायची. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी आई-वडिलांनी कधीही ताण दिला नाही. इतकेच टक्के गुण मिळव, असेही त्यांनी कधी सांगितले…

Read More

मृत्यूच्या 3 महिन्यांनंतर वडिलांची स्टॅम्पवर सही:कोट्यवधींच्या मालमत्तेसाठी आई-भावांचे षडयंत्र, बहिणीच्या RTI मुळे फुटले बिंग

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डल्ला मारण्यासाठी सख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचे अंबारनाथमध्ये समोर आले आहे. दिवंगत भाजप नेते गुलाबराव करंजुले यांचे मोठे बंधू आनंदराव करंजुले यांच्या नावे असलेल्या मालमत्तेसाठी चक्क त्यांच्या बनावट सह्यांचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतर तीन महिन्यांनी चलनात आलेल्या स्टॅम्प पेपरचा वापर करण्यात आला होता….

Read More

दुर्गाडी किल्ल्यावर पुन्हा धार्मिक तणाव; बकरी ईदच्या नमाजवरून भाजप-शिवसेना आक्रमक:कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढले

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाने ईदच्या दिवशी दुर्गाडी देवी मंदिरात हिंदू भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरुवारी सकाळपासूनच किल्ला परिसरात आंदोलन सुरू झाले असून काही कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढल्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर…

Read More

मराठवाड्यात शिवसेनेची कोंडी:विधान परिषदेच्या 4 पैकी 3 जागांवर भाजपचा, एकावर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मंत्री शिरसाट म्हणतात, समन्वय समिती निर्णय घेईल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेल्या छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत सध्या शिवसेनेची (शिंदे गट) मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर या जागांवर आपला दावा ठोकल्यामुळे शिंदेसेनेची अडचण झाली आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेतील सत्ता…

Read More

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली; फौजदारी कारवाईचे आदेश

नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील…

Read More