पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले
वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला….