शहराची जुनी जलवाहिनी फुटली; 2 तास 50फूट उंच उडाले फवारे:वेणेगाव येथे पाइपलाइनचा पॅच उडाल्याने गळती; महापालिकेचे फोन बंद, ग्रामस्थांचा मनस्ताप
सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरानजिक असलेल्या वेणेगाव येथे पाइपलाइनला लावलेला पॅच उडल्याने मोठी गळती लागली होती. शनिवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गलगत . सदर जलवाहिनी फुटताच वेणेगाव ग्रामस्थांनी सोलापूर महानगर पालिकेच्या वेबसाईट वरून नंबर घेऊन फोन लावले परंतु फोनला प्रतिसाद मिळत…