Headlines

पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली; जलस्रोतांवर वाढला ताण:नांदगाव तालुक्यात 65 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात‎

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सुमारे ६५ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत असून, मका, बाजरी, सोयाबीन, मूग आणि तूर पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. उशिरा पेरलेले बियाणे कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने खरीप हंगामाची…

Read More

भेंडाळा गावाजवळ अपघात;‎गोसावीपांगरी येथील दोघे ठार‎:दुचाकीची आयशरला मागून धडक, नोकरीसाठी दोघेही निघाले होते पुण्याला

गंगापूर छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भेंडाळा गावाजवळील रॉयल पॅलेस हॉटेलसमोर हा अपघात घडला. रितेश राजेश राठोड (२३) आणि अविनाश केशव चव्हाण (२४, दोघे रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही तरुण (एमएच २१ सीएल ६७७१) क्रमांकाच्या दुचाकीवरून…

Read More

गंगापूरमध्ये खरिपाच्या 43 टक्केच पेरण्या:पावसाची 47 टक्के तूट, 50 हजार हेक्टरवरील पिके संकटात‎

गंगापूर तालुक्यात यंदा पावसाळा एक महिना उशिरा सुरू झाला, त्यातच पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. आतापर्यंत खरिपाच्या वार्षिक पेरणी क्षेत्राच्या अवघ्या ४३ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ५७ टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने आधीच पेरलेली ४९ हजार ८०० हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गंगापूर…

Read More

जायकवाडी धरणावर ‘चित्रबलाक’ पक्ष्यांचे आगमन:पावसाळ्याच्या आगमनानंतर देखण्या जलपक्ष्यांचा किलबिलाट सुरू‎

पावसाळ्याच्या आगमनानंतर जायकवाडी धरणाचा परिसर पुन्हा एकदा जलपक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजू लागला आहे. यंदाच्या मोसमात नाथसागराच्या जलाशयावर मोठ्या संख्येने ‘चित्रबलाक’ (पेंटेड स्ट्रोक) पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. उथळ पाण्यात थव्याने संचार करणारे आणि आपल्या देखण्या गुलाबी छटांच्या पंखांनी संपूर्ण आसमंत उजळवून टाकणारे हे पक्षी सध्या पर्यटक आणि पक्षिप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. चित्रबलाकाचे स्थानिक नाव पेंटेड स्ट्रोक…

Read More

लासूर स्टेशन परिसरातील शाळा,‎ महाविद्यालयांवर पोलिसांची नजर‎:शिल्लेगाव पोलिसांचा विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पेट्रोलिंग उपक्रम

Marathi News Local Maharashtra Aurangabad Police Keep An Eye On Schools And Colleges In The Lasur Station Area. Shillegaon Police Conducts Special Patrolling Activities For The Safety Of Female Students. लासूर स्टेशन7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लासूर स्टेशन लासूर स्टेशन भागातील विविध शाळा, कॉलेज व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील ४० ते ५० खेड्यापाड्यातील विद्यार्थी-विद्यार्थ िनी दररोज…

Read More

जर जरी जर बक्ष यांच्या 740व्या उरुसासाठी प्रशासन झाले सज्ज:जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना अलर्ट मोडचा दिला आदेश‎

खुलताबाद ऐतिहासिक खुलताबाद नगरीतील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष (रह.) यांच्या ७४० व्या उरूस यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत उरूसासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. बैठकीत उरूस…

Read More

पर्यावरणप्रेमींचा पुढाकार:तोंडापूरच्या धरणामधून 8 क्विंटल मृत मासे 2 दिवसांत बाहेर काढले, विषारी रसायनामुळे हजारो मासे मृत्युमुखी‎

तोंडापूर प्रकल्पाच्या वरील बाजूस काही समाजकंटकांनी नदीपात्रात टाकलेले घातक रसायन पाण्यात मिसळल्याने हजारो मासे मृत पावले. हे मासे पाण्यात सडल्यामुळे धरणाला दुर्गंधीचा वेढा पडला होता. पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन दोन दिवसांत ८ क्विंटल मृत मासे बाहेर काढले. वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी जामनेर वनविभागाशी संपर्क साधला. त्यांनी आपले सहकारी भूषण कानडजे, कौस्तुभ जोशी, भगवान आढाव,…

Read More

समस्या सुटणार:छत्रपती संभाजीनगरच्या नो नेटवर्क झोनमध्ये नळ कनेक्शन हवे… मग आधी प्रॉपर्टी टॅक्स भरा, मिसारवाडी, सातारा, देवळाई आणि नारेगावला प्राधान्य

छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात वाढीव पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ‘नो नेटवर्क’ भागात याच महिन्यात नवीन नळजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, हे कनेक्शन मिळवण्यासाठी थकीत मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) भरणे बंधनकारक असेल, अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. ज्या मालमत्तांना अद्याप कर लागू नाही, त्यांना ४८ तासांत…

Read More

नाशिकला प्रेयसीचा खून करत प्रियकराने केली आत्महत्या:संशयित साहिल लव्हारेचे यवतमाळवरून येत कृत्य

यवतमाळमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० वाजता वैष्णवी आवारे हिचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या युवकासोबत…

Read More

आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही “जय श्रीराम’ जरूर म्हणतो, पण आम्हाला आता “भाजपमुक्त राम’ पाहिजे. प्रभू श्रीराम ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरच्या रामनगर येथील श्रीराम मंदिरात शनिवारी १८ जुलैला उबाठा शिवसेनेतर्फे रामरक्षा पठण…

Read More