लातूरमध्ये खळबळ:प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळल्या इंजेक्शनच्या बाटल्या
लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम.जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड (वय ४५) यांचा त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर-अंबाजोगाई रोडवर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. कारमध्ये गुंगीच्या औषधांची इंजेक्शन्स सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे लातूरसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली…