Headlines

कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या:सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे राहत्या घरातील घटना ‎

तालुक्यातील गलवाडा येथे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शामराव शेनफड जाधव (६०) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शामराव जाधव यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर खासगी संस्थांचे मिळून चार लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने…

Read More

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार:दहेगाव बंगला येथील घटना, ट्रकचालक ताब्यात‎

संभाजीनगर -पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला परिसरात मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. राजू उत्तम नामेकर (४५) आणि बाबासाहेब शिंदे (५२ , दोघेही रा. दहेगाव) अशी मृतांची नावे आहेत. १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास राजू उत्तम नामेकर आणि बाबासाहेब शिंदे हे दोघे आपल्या…

Read More

जायकवाडी धरणामध्ये गतवर्षी 75 तर यंदा केवळ 31.49% जलसाठा:गतवर्षी याच काळात पाच वेळा गोदापात्रात पाणी सोडले‎

जुलैचा मध्य उलटून गेला तरी जायकवाडी धरणात अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही. गतवर्षी याच काळात धरणात प्रतिसेकंद ५२ हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी येत होते. गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत धरणाचा साठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणातून दोन मह . धरणात सध्या ६८३.५३९ दलघमी म्हणजेच केवळ ३१.४९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची सध्याची…

Read More

फुलंब्रीमध्ये नोटीस भिरकावत आंदोलन:सुनावणीची तारीख देऊनही तहसीलदार गैरहजर राहिल्याचा तरुणाचा आरोप‎

तहसील कार्यालयात सुनावणीची तारीख देऊनही तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी वेळेवर दालनात हजर नसल्याने एका संतप्त तरुणाने थेट कार्यालयातच नोटीस भिरकावून अनोखे आंदोलन केले. मंगळवारी फुलंब्री येथील तहसीलदार योगिता खटावकर यांच्या दालनात शेत रस्ता, बांधाचे वाद आणि अतिक्रमण अशा विविध प्रकरणांची सुनावणी नियोजित होती. या सुनावणीसाठी अनेक पक्षकार वेळेत हजर झाले होते. मात्र, तहसीलदार हजर नसल्याने नेहमीप्रमाणे…

Read More

कन्नड शहरात 60 किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यास सुरुवात:दोन पाण्याच्या आणि एक साठवण टाकीचे काम प्रगतिपथावर‎

शहरातील ५५ हजार जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत कन्नड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या भूमिगत पाणी साठवण टाकीही बांधण्यात…

Read More

खुलताबाद नगर परिषदेत कर्मचाऱ्यांनी‎केले काळ्या फिती लावून आंदोलन‎:कन्नडच्या मुख्याधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरण; दोषींवर कारवाईची मागणी

खुलताबाद कन्नड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शासकीय निवडणूक कर्तव्य बजावत असताना झालेला कथित भ्याड हल्ला आणि धक्काबुक्कीच्या निषेधार्थ खुलताबाद नगर परिषद कमालीची आक्रमक झाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून खुलताबाद नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १३) हाताला काळ्या फिती बांधून ‘काम बंद’ न करता मूक निषेध नोंदवण्यात आला. तसेच…

Read More

बाबा फर्जनच्या 65 कोटींच्या संपत्तीवर 30 वर्षांनी परतलेल्या मुलांचा दावा:‘ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने त्यावर आमचाच दावा,’ फिरदोस फर्जनची ‘दिव्य मराठी’ला माहिती

शहरात ९०च्या दशकातील कामगार नेता व डॉन बाबा फर्जनच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण घबाड समोर आले आहे. या संपत्तीचे मूल्य सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. यानंतर छावणी पोलिसांनी फर्जनच्या मुलांना चौकशीसाठी बोलावले होते. एक मुलगा फिरदोस फर्जन हजर झाला आहे. त्याने ‘दिव्य मराठी’शी केलेल्या संवादात, ही…

Read More

MP-राजस्थान, दिल्लीत तापमान 38°C+:आसाम-अरुणाचलमध्ये पुराचा 1.40 लाख लोकांना फटका; बिहार-ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सूनच्या विश्रांतीमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गेल्या 3 दिवसांपासून तीव्र उष्णता जाणवत आहे. दिल्लीत मंगळवारी 38 अंश सेल्सिअस तापमान होते. गेल्या 24 तासांत अरुणाचल प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात मान्सूनचा पाऊस आणि पुरामुळे बाधित झालेल्या…

Read More

केंद्रात दोन, राज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदे यांची दिल्ली वारी:इकडे फडणवीसांसोबत वर्षावर जयंत पाटील, तटकरे, पटेलांची बैठक

‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धवसेनेचे सहा खासदार फोडल्यामुळे केंद्रीय स्तरावर शिवसेनेचे (शिंदे गट) वजन वाढवण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे तसेच राज्यात एका कॅबिनेट मंत्रिपदावर दावा केला…

Read More

जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले 3नवे संचालक भाजपच्या तंबूत दाखल:अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदेसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकल्या असून उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून विजय संपादन केला. २० पैकी १९ सदस्य महायुती पॅनलचे असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे होणार यात दुमत नाही. अध्यक्षपदी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला ३ सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि अपक्ष…

Read More