Headlines

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More

मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत; मराठाला भवनासाठी उपलब्ध करून दिली 28 गुंठे जमीन

मागील 2-3 वर्षांत जे काही घडले त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात, पात, धर्म सोडून राजकारण झाले. पण अखेर मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने मराठा भवनासाठी तब्बल…

Read More

महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ९ जणांवर गुन्हा:खंडणी मागितल्याचा आरोप; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्रास दिल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या आवारात घडली. विभागीय अतिक्रमण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ऋषिकेश अभिमान सावंत, सुनिल जयवंतराव पवार, उमेर मैनुद्दीन शेख,…

Read More

दरवाढीचा निषेध:इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंपावर आंदोलन, ‘मेलाेडी’च्या घोषणा देत सरकारवर टीका

पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारत शुक्रवारी थेट पेट्रोल पंपावर आंदोलन केले. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे म्हणत काँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. आंदोलन वाजीफदार पेट्रोल पंपासमोर करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका…

Read More

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती

अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते….

Read More

आधार कार्डचा वापर फक्त ओळखीसाठी व्हावा:आज SC मध्ये सुनावणी; याचिकेत दावा – सध्या पत्ता, जन्मतारखेचा पुरावा मानला जातो

सर्वोच्च न्यायालय आज आधार कार्डच्या वापरासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे. याचिकेत म्हटले आहे की, आधार कार्डचा वापर ओळखपत्रापलीकडे जाऊन नागरिकत्व, निवास आणि जन्मतारखेच्या पुराव्यासाठी केला जात असेल, तर कायद्याने याला परवानगी नाही. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या पुष्टीकरणापुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्याची…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात; राज्यातील विनापरवाना IVF केंद्रांवर सभागृहात गंभीर चर्चा

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. काल काल अधिवेशनात अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी, नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार आणि कुंभमेळा निधी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, राज्यातील वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून, लहान…

Read More

शालेय गणवेशाचे अनुदान 300 वरून 500 रुपये करणार:जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय, शिक्षणाचा दर्जा उंचावणार‎

देशपातळीवर गौरव मिळविलेल्या सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशस्वी शैक्षणिक मॉडेलचा विस्तार आता संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत शालेय गणवेशाचे अनुदान ३०० वरून ५०० रुपये करण्याचा ठराव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात पाचपटीने वाढ, तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला….

Read More

हिंगोलीत दुचाकीचा भीषण अपघात:पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, कांडलीफाटा शिवारातील घटना

आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ता. 1 उत्तरीय तपासणी करणयात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (ता. हदगाव) येथील अर्जुन इंगळे हे त्यांच्या…

Read More

107 कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित:घाेटी टाेलनाक्यावर नवीन कंत्राटदार नेमेपर्यंत नोकरी कायम ठेवण्याचे आश्वासन‎

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरील कार्यरत असणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांना कमी केल्यानंतर या कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगरपरिषदेचे गटनेते फिरोज पठाण यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घोटी टोलनाक्यावर नवीन कंत्राटदार येईपर्यंत सध्याचेच कामगार कायम ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटी येथील टोलनाका इगतपुरी एक्स्प्रेस…

Read More