खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २००…