मंगरूळ कांबे-शेलू पाणंद रस्ता चिखलात; मशागतीसाठी अडचण:रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पाणंद वाटा
तालुक्यातील मंगरूळ कांबे ते शेलू या मुख्य पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले असून, खरीप हंगामाची पेरणी व मशागतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य वाहून नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाकडून…