मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद!:काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीने नगरपालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मेहकर नगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून महाविकास आघाडीचे संख्याबळ 16 वर…