मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार
मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत,…