शेवगावचा वन प्रकल्प रामभरोसे; देखभालीअभावी पर्यटन केंद्र ओस:वन पर्यटन केंद्रात 3 वर्षांपासून केवळ कागदावरच नंदनवन
शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेले वन पर्यटन केंद्र सध्या कमालीचे दुर्लक्षित झाले आहे. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात पसरलेला आणि तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला . निसर्गाची जपणूक व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात…