Headlines

अप्पर वर्ध्यात 58 टक्के पाणीसाठा; पर्जन्यमान 376.20 मीमीने घटले:उन्हाळ्यात नागरिकांची ‘अग्निपरीक्षा'', पाणी आरक्षणावर फेरविचार‎




अमरावती जिल्ह्याची ‘जीवन वाहिनी’ समजल्या जाणाऱ्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा (नल-दमयंती सागर) धरणातील जलसाठ्यात यावर्षी मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा तब्बल ४०.५२ टक्क्यांनी खाली आल्यामुळे आगामी उन्हाळ्यात अमरावतीसह आसपासच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून शेती आणि उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आरक्षणावर जलसंपदा विभागाला फेरविचार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने महसूल व जलसंपदा विभागात पत्रव्यवहारही सुरु झाला आहे. अप्पर वर्धा धरण मोर्शी, वरुड आणि परिसरातील हजारो हेक्टर शेतीसाठी सिंचनाचा मुख्य स्रोत म्हणूनही या धरणाकडे पाहिले आहे. अमरावती येथील एमआयडीसी व स्थानिक उद्योगांनाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा ४०.५२ टक्क्यांची मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार गतवर्षी धरणात ९९.१८ टक्के जलसाठा होता. यावर्षी मात्र धरणात केवळ ५८.६६ टक्केच पाणी आहे. परंतु यावर्षी ते ३३०.८५ दलघमीवरच थांबले आहे. २०२४ ला अप्पर वर्धा धरणात ५६१.२६ दलघमी, २०२३ ला ५६४.०५, २०२२ ला ५५८.४९ आणि २०२१ मध्ये ५५९.४१ दशलक्ष घनमीटर पाणी होते. त्यामुळे सामान्य अमरावतीकरांना पिण्याच्या पाण्याची तर उद्योजक आणि शेतकऱ्यांना व्यवसाय आणि शेतीबाबतची चिंता सतावत आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार अमरावतीची वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्यातील संभाव्य तीव्र गरज लक्षात घेता, नियोजन आत्तापासूनच आखावे लागणार आहे. शहरात पाणी कपात लागू करावी लागते की काय, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शेती आणि उद्योगांच्या आरक्षणावर फेरविचार शेतीला ठरवून दिलेल्या सिंचनाच्या पाळ्यांमध्ये कपात करावी लागू शकते. तसेच औद्योगिक क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन फेरनियोजन केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *