![]()
मुलीला तिच्या आवडीच्या खेळात करिअर करू द्यायचे होते. त्यासाठी गावातच काय तालुक्यात अन् जिल्ह्यातही तशी अपेक्षित सुविधा दिसेना म्हणून वडील कल्याण आपल्या १२ वर्षांच्या कन्येला घेऊन संत ज्ञानदेवाच्या आळंदीची वाट धरली. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटी
.
विहाळच्या तालमीत श्रीगणेशा…
आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात प्रवेश घेतला अन् जोग व्यायामशाळेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव. तीन महिन्यांतच २०१७-१८ मध्ये पहिले पदक पटकावले. पुढे ४६ किलो वजनी गटात सुवर्णपदक. लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला व्यायामशाळेत प्रशिक्षक अमोल थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव सुरू केला. आजपर्यंत तिने १८ पदकांची कमाई केली आहे. महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदके. जुलै २०२५ आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने देशासाठी कांस्यपदक पटकावले.