![]()
नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पुरावे आणि स्थानिक गुप्तहेरांच्या मदतीने पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोन चौक परिसरातील ठाकरे टी स्टॉलजवळ घडली होती. जितेंद्र उर्फ पप्पू बारेलाल तांडेकर (वय ३२, रा. राजीव नगर, एमआयडीसी) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृतकचा भाऊ दिनेश बारेलाल दांडेकर (वय ४०) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपास पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील नागरिकांची चौकशी केली. तसेच, घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. या कौशल्याने केलेल्या तपासामुळे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. सुमित रवींद्रकुमार शुक्ला (वय ३२, रा. शेखापूर सराय भारत, तालुका सोराव, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर आला. आरोपी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, आरोपी सुमित शुक्ला याने जितेंद्र उर्फ पप्पू तांडेकर याचा खून केल्याची कबुली दिली आहे.
Source link
एमआयडीसी खून उघडकीस, उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक:तांत्रिक पुरावे आणि गुप्तहेरांच्या मदतीने पोलिसांनी छडा लावला