Headlines

गडचिराेलीत आश्रमशाळेत आठवीच्या मुलीची आत्महत्या:दुर्गोत्सवाला गावी न नेल्याने उचलले टोकाचे पाऊल




पालक सभेसाठी आश्रमशाळेत आलेल्या आई – वडिलांना आरमोरी येथील दुर्गोत्सवासाठी गावी नेण्याची मागणी केली. ती पालकांनी नाकारल्याचा संताप आल्याने आश्रमशाळेतील आठवीच्या मुलीने पालक गावी जाताच आश्रमशाळेच्या वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आश्रमशाळेत सोमवारी घडली. राणू क्रिष्णा हलामी असे आत्महत्या केलेल्या १४ वर्षीय मुलीचे नाव आहे. ती सोनसरीपासून तीन किमीवरील मोहगाव येथील रहिवासी होती. सोमवारी आश्रमशाळेत पालक सभा होती. त्यासाठी तिचे आई-वडील आले होते. राणू आईवडिलांना भेटायला आली. तिने आरमोरीला दुर्गोत्सवासाठी तब्येतीचे कारण सांगत घरी येण्याचा आग्रह धरला. आईवडिलांनी तिला समजावत पैसे दिले. ते तिने फाडत धमकी दिली की तिला ते घेऊन गेले नाही तर ती जिवाचे बरेवाईट करेल. आईवडील जाताच तिने वसतिगृहातील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *