Headlines

चौंढाळा येथे 15हजार भाविकांनी घेतले श्री रेणुका माता देवीचे दर्शन:देवी कुमारिका स्वरूपात असल्याने विवाह सोहळे होतात वेशीबाहेर‎



पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा हे ऐतिहासिक व धार्मिक गाव आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळखले जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडच्या रेणुका मातेचे उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौंढाळा येथी

.

चौंढाळा गावात देवीविषयी असलेल्या अगाध श्रद्धेतून अनेक शतकांपासून काही अनोख्या परंपरा पाळल्या जातात. देवी येथे कुमारिका स्वरूपात विराजमान असल्याने गावात शुभ विवाह सोहळे आयोजित केले जात नाहीत. सर्व विवाह सोहळे गावाच्या वेशीबाहेर शिवारात मंडप उभारून पार पाडले जातात. देवीच्या सन्मानार्थ गावात खाट किंवा पलंग वापरण्यास मनाई असून, ग्रामस्थ झोपण्यासाठी मातीचे वा सिमेंटचे ओटे वापरतात. तसेच, देवीच्या निवासापेक्षा स्वतःचे घर उंच नसावे या भावनेतून गावात दुमजली इमारत बांधली जात नाही. विशेष म्हणजे, हनुमान मंदिराची स्थापना नसलेले हे परिसरातील एकमेव गाव मानले जाते. हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर ३६ कोरीव खांबांच्या भव्य सभामंडपाने नटलेले आहे. मंदिराभोवती १५०×१५० फूट लांबीची, ४ फूट रुंद आणि १३ फूट उंच दगडी तटबंदी असून, सुमारे ५० फूट उंच दीपमाळ सर्वांचे लक्ष वेधून घेते. गाभाऱ्यात रेणुका मातेची स्वयंभू तांदळा मूर्ती विराजमान आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, एका राक्षस राजाने देवीशी विवाहाचा घाट घातला होता; मात्र अट पूर्ण न झाल्याने व फसवणूक झाल्याने देवीच्या शापाने संपूर्ण वऱ्हाडाचे दगडी शिळांमध्ये रूपांतर झाले. या शिळांना आजही लग्नाचे वऱ्हाड म्हटले जाते. या विवाह मांडवावरूनच पुढे परिसराला विहामांडवा हे नाव प्राप्त झाले असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंदिरात विविध धार्मिक विधी, टिपूर परंपरा व यात्रा संत एकनाथ महाराजांच्या भक्तीपरंपरेशी जोडलेल्या या देवस्थानात अष्टमीला विहामांडवा येथून देशमाने परिवाराकडून टिपूर आणण्याची परंपरा आजही कायम आहे. उत्सवादरम्यान दररोज पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू राहते. सकाळी ८ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता नैवेद्य आणि सायंकाळी पुनश्च महाआरती होते. पाचव्या माळेपासून येथे मोठ्या यात्रेला सुरुवात होते, ज्या दरम्यान दररोज सकाळी ७ वाजता दुर्गा पाठ व देवी सप्तशती पठण केले जाते. अष्टमी व नवमीच्या दिवशी पहाटे ३ वाजता होम-हवन, सकाळी ९ वाजता पूर्णाहुती आणि ९.३० वाजता आरती होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *