Headlines

जशी मराठी येते तशीच हिंदीही बोलता आली पाहिजे:भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचे विधान, म्हणाले- जे आहे ते आहे, यात नाटक नको




सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वादाचे वातावरण सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चलकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला होता. हे असे चित्र असतानाच आता भाजपच्याच आमदारांनी विधान केले आहे. जसे मराठी बोलता येते तसेच हिंदी पण बोलता आले पाहिजे, असे आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे. कालिदास कोळंबकर म्हणाले, जशी मराठी येते तशीच हिंदी बोलता आली पाहिजे. देशात आपण कुठे पण जाणार, बंगळुरूला जाणार, कर्नाटकला जाणार, तिथे मराठी नहीं चलेगा, हिंदी चलेगा. जे आहे ते आहे. हे नाटक नाही पाहिजे. सध्या भाजपकडून रिक्षा टॅक्सी चालक अमराठी भाषिकांना मराठीचे धडे दिले जात आहेत. असाच एक कार्यक्रम वडाळा येथील किडवाई नगर येथे 23 मे रोजी पार पडला होता. यावेळी कोळंबकर बोलत होते. ‘मराठी बोला, महाराष्ट्र जोडा… बघताय काय, सामील व्हा!’ या घोषवाक्याखाली अमराठी भाषिकांना जुजबी मराठी शिकवण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या पुस्तिकेचे वाटप एका कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला वडाळ्याचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थिती लावली. मात्र, मराठीचा प्रचार करणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी चक्क हिंदीतून भाषण केले. जसे मराठी बोलता येते, तसेच हिंदीही बोलता आले पाहिजे, अशी भूमिका मांडताना त्यांनी देशपातळीचा संदर्भ दिला. आपण बंगळुरू किंवा कर्नाटकात गेलो, तर तिथे मराठी चालणार नाही, हिंदीच चालेल, असा व्यावहारिक दाखला देत जे वास्तव आहे ते स्वीकारले पाहिजे, यात कोणतेही नाटक नको, असे रोखठोक मत आमदार कोळंबकर यांनी यावेळी व्यक्त केले. माझा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय- कोळंबकर कालिदास कोळंबकर म्हणाले, माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. मला मोदीजींनी विचारले कालिदासजी तुम्ही 52 जातीच्या मतदारसंघात कसे जिंकून येतात? यावेळी मी त्यांना सांगितले की, मी मतदारांना त्यांचे काम विचारतो, मी जात-पात बघत नाही. जात पात धंदा माझ्याकडे चालत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *