![]()
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने मला क्लीन चीट दिली आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात केला होता. त्यामुळे दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी आदित्य व दिशा मृत्यू प्रकरणावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली. शनिवारी सालियन स्वत: नोटीस घेऊन मातोश्रीवर धडकणार आहेत. ठाकरे,देशमुखांनी ७ दिवसांत ५०० कोटींचा डिमांड ड्राफ्ट द्यावा, राष्ट्रीय दैनिकांच्या पहिल्या पानावर ए-४ आकाराचा जाहीर माफीनामा छापावा,प्रमुख वृत्तवाहिन्यांवर ३ मिनिटांचा दिलगिरीचा व्हिडिओ प्रसारित करावा, असे नोटीशीत म्हटले आहे. सालियान यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, सालियान यांची याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा न्यायालयाने आधीच फेटाळला आहे. कथित मोबाईल टॉवर लोकेशन, डिजिटल फॉरेन्सिक पुराव्यांवर ठाकरेंनी अजूनही उत्तर दिलेले नाही. सीबीआयने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली नाही. तरीही त्यांनी प्रतिज्ञापत्रातून केवळ उच्च न्यायालयाची दिशाभूलच केली नाही, तर दिशाच्या वडिलांचीही बदनामी केली, ५०० कोटींची ही नोटीस दिवाणी कारवाईपुरती असून, खोटी साक्ष, न्यायालयाचा अवमानाबद्दल स्वतंत्र फौजदारी खटला दाखल करत आहोत. कलम ३५६ अंतर्गत फौजदारी खटला भरता येतो खोटी विधाने किंवा बदनामी झाल्यास दिवाणी कायद्यानुसार भरपाई आणि बीएनएस कलम ३५६ अंतर्गत फौजदारी खटला भरता येतो. न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर असत्य माहिती देणे हा गुन्हा आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान व दंडात्मक कारवाई होऊ शकते. भारतीय साक्ष अधिनियमातील ६३ अंतर्गत विशेष प्रमाणपत्र लागते. मोदी, ट्रम्प यांचे नाव का नाही याचेच आश्चर्य : उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे म्हणाले की, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री म्हणून माझे नाव गोवले जात आहे. या प्रकरणाशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही. राजकीय बदनामीसाठी नावे ओढली जातात. मोदी,ट्रम्प यांचे नाव का नाही, याचे आश्चर्य वाटते.
Source link
दिशाच्या वडिलांची आदित्य ठाकरे, देशमुख विरोधात 500 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस:सीबीआयने क्लीन चिट दिल्याचा आदित्य यांचा होता दावा