Headlines

दुष्काळामुळे मराठवाड्यात 35 हजार कोटींचे नुकसान:हेक्टरी 1 लाखाची मदत द्या- रोहित पवार, कठीण प्रसंगी 5 हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका




मराठवाड्यात ५५ टक्के कमी पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा न करता हेक्टरी १ लाख रुपयांची ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांशी संवाद साधण्यासाठी पवार शहरात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले, तेव्हाही सरकारने योग्य मदत केली नाही. यंदा दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. अशा कठीण प्रसंगी सरकारने ५ हजार रुपयांची तोकडी मदत जाहीर करून गरिबांची आणि शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी डॉ. प्रतापसिंह पाटील, नवीन ओबेरॉय यांची उपस्थिती होती. स्थानिक अन् राष्ट्रीय प्रश्नांची हाताळणी राज्यातील गुन्हेगारीवरून आणि गृह विभागाच्या अपयशावर त्यांनी चिंता व्यक्त केली. अयोध्या मंदिर आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचाराचे दाखले दिले. पवार यांनी स्थानिक अन् राष्ट्रीय प्रश्नांवरही मतप्रदर्शन केले. महाविकास आघाडीची व्यूहरचना कशी असावी, याचा आराखडा त्यांनी मांडला. कोल्हापूर निकालानंतर राजकारणाला नवी दिशा गोकुळ दूध संघाच्या निकालावर रोहित पवार म्हणाले की, या निकालाचा थेट आणि सकारात्मक परिणाम आगामी काळात महाराष्ट्रातील शिक्षक, पदवीधर व इतर निवडणुकांवर होईल. या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एक नवी ऊर्जा मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *