Headlines

नौदल गोदीमधील नव्वद व्हिडिओ पाकला पाठवले:प्रशिक्षणार्थी हस्तकांसोबत ग्रुप कॉलमध्येही- पोलिस




मुंबईतील नौदल गोदीतील (नेव्हल डॉकयार्ड) संवेदनशील ठिकाणांचे सुमारे ९० व्हिडिओ चित्रित करून ते संशयित पाकिस्तानी गुप्तचर हस्तकांना पाठवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला २१ वर्षीय प्रशिक्षणार्थी बंटी रामप्रकाश मीना हा संशयित हस्तकांसोबत थेट ग्रुप कॉलमध्येही सहभागी होता, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयाला दिली. काय आहे नेमके प्रकरण? कुलाबा येथील बधवार पार्कचा रहिवासी असलेला मीना हा नौदल गोदीत प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता. गेल्या आठवड्यात त्याला भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शासकीय गुपिते कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयात रिमांड अर्ज सादर केला. मीना हा nattuu3 या इन्स्टाग्राम खात्याच्या वापरकर्त्यांच्या आणि एका व्हॉट्सॲप क्रमांकाच्या संपर्कात होता. ही दोन्ही खाती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे हस्तक चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही व्यक्तींनी जहाज देखभाल करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी असल्याची बतावणी करून गोदीत येणाऱ्या नौदलाच्या जहाजांबाबत संवेदनशील माहिती मागवली असावी. इतर ओळख पटवणे सुरू या कथित हेरगिरीच्या जाळ्यात इतर कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. मीनाचे मोबाइल संपर्क, संभाषण आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू आहे. तसेच, कथित ग्रुप कॉलमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवून माहिती देवाणघेवाणीचे हे जाळे किती मोठे आहे, याचा छडा लावण्यासाठी तपास पथके कार्यरत असल्याचे मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. शासकीय गुपिते कायदा काय आहे? Q या कायद्यांतर्गत गुन्हा कधी दाखल होतो?
उत्तर: देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रतिबंधित क्षेत्रांचे (उदा. नौदल गोदी, लष्करी तळ) छायाचित्रण करणे, व्हिडिओ काढणे किंवा गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राच्या हस्तकांना पुरवणे हा या कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. Q बनावट ओळखीचा धोका काय?
उत्तर: पूर्वी “हनीट्रॅप’द्वारे माहिती काढली जात असे. मात्र आता जहाज देखभाल किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तरुण कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्याचा नवा पॅटर्न समोर येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *