![]()
अकलूमधील श्रीराम अश्व प्रदर्शनात आलेल्या रूबाबदार अन देखण्या मारवाड अश्वाने लक्ष वेधले. माजी सहकार मंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ येथे भरवल्या जात असलेल्या श्रीराम अश्व प्रदर्शनास शनिवारी सुरुवात झाली. देशभरातील निवडक, जातिवंत
.
शनिवारी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन निहानसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाले. या वेळी सरकार मानसिंगराजे गायकवाड, राष्ट्रीय हॉकी खेळाडू व कॅप्टन अजित नंदाल, पंजाबचे सुखविंदर सिंग सिधू, राजस्थानचे शंतनू खेंपूर, डॉ. अनिल लहाने, अतुल माने, नितीन कोते पाटील, नाशिकचे राहुल गोदारे, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.या वेळी शशांक पवार यांनी प्रास्ताविक केले. याठिकाणी ऑल इंडिया मारवाड हॉर्स सोसायटीच्या वतीने प्रदर्शनात सहभागी आश्र्वांची नोंदणी केली जात होती. अनुक्रमे पंचासमोरील जागेतून गुणांसाठी फिरवले जाते.