Headlines

संभाजीनगरात वीजचोरीविरोधात मोठी कारवाई:3 दिवसांत 80 जणांवर गुन्हे, 43% वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणचा धडाका




शहरातील वीजगळतीचे प्रमाण सध्या ४३ टक्क्यांवर गेल्याने महावितरणने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी शहरासह विविध भागांत धडक मोहीम राबवण्यात आली असून, गेल्या तीन दिवसांत ८० वीजचोरांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आल्याची माहिती असून यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. स्मार्ट मीटरमध्ये फेरफार केल्याचे झाले उघड चिकलठाणा उपविभागातील विमानतळ शाखेचे सहायक अभियंता प्रदीप मिसाळ व त्यांच्या पथकाने हिनानगर, सावित्रीनगर, चिकलठाणा, मोतीवाला कॉलनी, मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी, भारतनगर आणि मुकुंदनगर भागात तपासणी केली. यात खंडित केलेल्या स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून परस्पर वीज जोडल्याचे उघडकीस आले. या कारवाईत ५,०४१ युनिट्सची (९८,७८० रुपये) वीजचोरी पकडण्यात आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तहेशीम खान मुसरत खान, सख्वाद्दीन शाम्सोद्दिन तांबोळी, सय्यद मोसिन सय्यद यासीन, मोहम्मद इसुफ मोहम्मद सईद, शहाजानबी दगदुबाई शेख, अरबाझ शेख शेरू, उज्ज्वला दगडू साबळे, पी. इम्रान इमान अयनूर शेख, इस्माईल ए. रहमान शेख, आशालता बाबुराव रानडे, राजू उत्तमराव चव्हाण आणि बकाल सांडू साळुबा या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजगळती १० टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी तांत्रिक व वाणिज्यिक हानी राज्यभरात १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार थकीत वीज बिल वसुलीला प्राधान्य देत वीजचोरीविरुद्ध ही कडक मोहीम हाती घेण्यात आली. ३२ जणांकडून ४.८१ लाखांची चोरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण शाखेचे (वाळूज महानगर) सहायक अभियंता शेख फेरोज व त्यांच्या पथकाने राबवलेल्या मोहिमेत वडगाव कोल्हाटी येथील ३२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या ग्राहकांनी मिळून तब्बल ४ लाख ८१ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. वीजचोरी प्रकरणात ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *