![]()
तालुक्यातील पिंप्री येथे जागेच्या मालकी हक्काच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. फिर्यादी साईनाथ तेजराव सिरसाठ यांच्या घरासमोर ही घटना घडली. फिर्यादीचे वडील तेजराव सिरसाठ यांच्या नावावरील मिळकत क्रमांक १४२ मधील २५×१८ फूट जागेवरून चुलत भावांमध्ये वाद सुरू आहे. याच वादातून कृष्णा रामचंद्र सिरसाठ याने फिर्यादीला काठीने मारून डोळ्याखाली दुखापत केली. दरम्यान, आरोपी कुर्शिवताबाई सिरसाठ, मनिषा विठ्ठल सिरसाठ व पुष्पा कृष्णा सिरसाठ यांनी फिर्यादीच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
Source link
सिल्लोड:पिंप्री येथे जागेच्या वादातून मारहाण