![]()
हॉटेल अमरप्रीत (अवतार मोटेल्स आणि सिने प्रा. लि.) मध्ये बटरच्या नावाखाली आरोग्यास घातक असणाऱ्या मार्गारीनचा वापर करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने छाप्यात सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस आणि मशरूमचा साठा जप्त केला आहे.
.
या त्रुटींनंतर हॉटेल अमरप्रीतचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. हॉटेलमधील खाद्यसेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. ही कारवाई सहआयुक्त दयानंद पाटील, कीर्तिका झाडे, वर्षा रोडे, प्रज्ञा सुरसे आदींच्या पथकाने केली.
बटर व्हर्सेस मार्गारीन : नफ्याचे गणित
बटरचा दर ४५० ते ५५० रुपये प्रतिकिलो आहे, तर मार्गारीन १२० ते १८० रुपयांमध्ये मिळते. बटरऐवजी मार्गारीन वापरल्यास कच्च्या मालाचा खर्च ६० ते ७० टक्क्यांनी घटतो. यामुळे थेट नफ्यात बदल होतो. अस्सल बटर फ्रिजबाहेर राहिल्यास किंवा तापमान कमी-जास्त झाल्यास लगेच खराब होते आणि त्याला आंबट/खराब वास येतो. याउलट, मार्गारीनमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज असल्यामुळे ते साध्या तापमानालाही कित्येक दिवस खराब होत नाही.
छाप्यात आढळलेले अतिगंभीर प्रकार
- चिलिंग सेंटर आणि स्टोअर रूममध्ये सडलेली काकडी, ढोबळी मिरची, फुलकोबी व पत्ताकोबी आढळून आली.
- या ठिकाणी मुदतबाह्य झालेला पिझ्झा बेस आणि खराब मशरूम वापरले जात होते. विनालेबल
- मार्गारीनचा खेळ : बटरच्या नावाखाली ट्रान्स फॅटने भरलेल्या मार्गारीनचा वापर करण्यात येत होता.
- स्वयंपाकघराच्या फरशीवर सांडपाणी साचलेले होते, तर कचराकुंड्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या.