येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून कैद्याला मारहाण:दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल
येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव अशी आहेत. वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी सात…