पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास:वाकडेवाडीत मध्यरात्री घडली घटना; रिक्षाचालकासह साथीदारावर गुन्हा
पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाकडेवाडी परिसरात एका रिक्षाचालकाने प्रवाशाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, तर पुणे स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली. पहिल्या घटनेत, २० जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. ओदिशा येथील मूळ रहिवासी असलेला…