Headlines

दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मदत:स्मृती सेवाश्रम आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे दिव्यांग बांधवांना आधार व स्वावलंबनाची दिशा देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजू दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन, पीठ गिरणी व मिरची कांडप केंद्र यांसारखे रोजगाराभिमुख साहित्य वितरित करुन मदतीचा हात देण्यात आला. याचवेळी कार्यक्रमाचे प्रमुख…

Read More

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎

मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मोर्शी शहरातील एसटी डेपो लगत अप्पर वर्धा कॉलनीकडे…

Read More

कोणार्कच्या 60 कर्मचाऱ्यांचे बडनेरा परिसरात कामबंद:तीन महिन्यांपासून नियमित वेतन देत नसल्याचा आरोप‎

शहरातील स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट मिळवणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या झोन क्र. ४, बडनेरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्यामुळे हातातील झाडू खाली ठेवत कामबंद आंदोलन केले. कोणार्कच्या सफाई कामगारांबाबतच्या एकूणच धोरणामुळे शहरात आधीच स्वच्छतेबाबत बोंब असताना कर्मचारी दिवसभर कामबंद आंदोलन करीत असल्यामुळे पुन्हा या परिसरातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोणार्कला स्वच्छतेचे…

Read More

शूटर जसपाल राणावर आज अंत्यसंस्कार:वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर होणार, मुख्यमंत्री योगी उपस्थित राहणार

उत्तराखंडचे दिग्गज नेमबाज आणि पद्मश्री जसपाल राणा यांच्यावर आज वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7:45 वाजता त्यांचे पार्थिव शरीर दिल्लीहून देहरादूनमधील पोंडा येथील मझोन गावात पोहोचले होते. तिथे रात्री उशिरापर्यंत खेळाडू, राजकीय नेते आणि हितचिंतकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी पार्थिव शरीर चार्टर्ड विमानाने वाराणसीला नेण्यात येईल. अंत्यसंस्कारात क्रीडा…

Read More

शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यावर समाजाची प्रगती अवलंबून- डॉ. इंगळे:ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात‎

मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील डॉक्टरांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात पार पडला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही अपरिहार्य आहेत. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मूलतत्त्वे आहेत. जात, धर्म आणि विषमता यापलीकडे जाऊन सर्वसमावेशक व न्यायाधिष्ठित समाज घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण…

Read More

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते…

Read More

शरद पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर:म्हणाले- पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही; ते खूप पुढे गेलेत

देशाच्या राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जवाहरलाल नेहरू आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही, या शरद पवार यांच्या विधानाचा समाचार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, त्यांची तुलना होऊच शकत नाही,…

Read More

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख:जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील; 2 महिन्यांपूर्वी उप लष्करप्रमुख बनले होते

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे नवे प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती केली आहे. सेठ सध्या उपसेनाप्रमुख (व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ) पदावर कार्यरत आहेत. ते विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील. जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत आहे. त्यांनी 30 जून 2024 रोजी लष्करप्रमुख पदाची…

Read More

सोनसाखळी चोरावर पोलिसांची फिल्मी स्टाइल झडप, व्हिडिओ:'क्राइम पेट्रोल' पाहून बनला चेन स्नॅचर; 150-200 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी रचला 'डेड एंड' सापळा

‘क्राइम पेट्रोल’ हा लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेचा कार्यक्रम पाहून पोलिसांना चकवा देण्याची युक्ती शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्याला जमिनीवर झडप घालून पकडले. या थरारक कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अटक…

Read More

रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर:म्हणाले- थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर RPI मध्ये या, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आता रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट भाजपसोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे. “शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावे,” असे जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे (RPI)…

Read More