टाळ-मृदुंगाच्या तालावर राहुरीकर झाले तल्लीन:दिंडी सोहळ्याने वेधले उपस्थितांचे लक्ष, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशांनी सजलेल्या फलकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रशालेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून सुरू झालेली ही…