Headlines

वंचित बहुजन आघाडीचा आज 'महाराष्ट्र बंद':कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा

नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना…

Read More

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बॉलिवूड दिग्गजांनी आवाज उठवला:अनुपम खेर म्हणाले- हे वर्तन नसावे; रत्ना-सीमा, राजकुमार राव यांनीही पाठिंबा दिला

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर, रत्ना पाठक शाह, सीमा पाहवा आणि राजकुमार राव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वात निष्पक्ष आणि प्रामाणिक म्हटले, तसेच त्यांना बाहेरील राजकीय पक्षांच्या अजेंड्यापासून सावध…

Read More

परीक्षेतील भ्रष्टाचारविरोधात एल्गार; विद्यार्थ्यांचे आंदोलन:आंदोलनावरील कारवाईचा निषेध; पावसातही एकवटली तरुणाई‎

एमपीएससी, यूपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात बुधवारी तरुणाईने एल्गार पुकारला. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भरपावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत नीट पेपर फुटीबाबत कठोर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत स्वतंत्र चौकशीचा आग्रह…

Read More

टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीगणेशा:आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जागर; 29 रोजी समारोप‎

जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, २९ जुलै (आषाढ शुद्ध पौर्णिमा) रोजी होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड…

Read More

एमपी-यूपीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा:आसाममध्ये 24 तासांत 10 मृत्यू; काश्मीरमध्ये नाल्यात वाहून आई-मुलाचा मृत्यू

मध्य प्रदेशात मान्सूनच्या पावसाचे 3 मजबूत सिस्टीम सक्रिय आहेत. यामुळे राज्यात सलग 60 तासांपासून पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेशात आज 69 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. तर, गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आसाममध्ये गेल्या 24 तासांत…

Read More

शाश्वत शेती विकासासाठी व्यावसायिक देशी गोवंशांचे जतन:संवर्धन आवश्यक, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन

शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी ही संकल्पना खऱ्या अर्थाने कृतीत आणण्यासाठी व्यावसायिक शेतीला दुग्ध व्यवसायासारख्या सक्षम पूरक व्यवसायाची गरज आहे. राज्याचा, विशेषतः विदर्भ व मराठवाड्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी व्यावसायिक देशी गोवंशाचे जतन व संवर्धन आव . महाराष्ट्र शासनाने दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला…

Read More

योजनेतील अपात्र ठरवलेल्या महिलांनाही न्याय देण्यात यावा:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी‎

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी व पात्रता पडताळणीनंतर राज्यातील ९२ लाख, तर जिल्ह्यातील ३७ हजारांवर महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना लाभ देण्याची मागणी राकाँकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त निवेदन देण्यात आले. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पालघरमध्ये शाळांना सुट्टी, पुण्यात 'रेड अलर्ट'; मराठवाडा-विदर्भात दिलासा, शनिवारनंतर उघडीप?

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर नाशिक, पालघरसह कोकणातील जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुराच्या पाण्यामुळे १५ ते १६ गावांचा मुख्य संपर्क तुटला…

Read More

श्री पांडुरंगाच्या नगरीमध्ये पोहोचली रुक्मिणी माता:पंढरपूर येथील मठात मातेच्या पालखीचे स्वागत‎

विठू माऊलीला भेटण्याच्या ओढीने १९ जूनला पायी वारीद्वारे माहेर श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून निघालेल्या रुक्मिणी माता बुधवारी २२ जुलैला पंढरपुरात पोहोचल्या. ही परंपरा गेल्या ४३२ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरातील रुक्मिणी मठात दरवर्षी प्रथम विश्रांती घेते. त्यानंतर युगानुयुगे विटेवर उभ्या श्री हरि पांडुरंगाच्या भेटीला आषाढी एकादशीला पोहोचते. माता रुक्मिणी व श्री विठ्ठलाच्या…

Read More

‘आम्ही मोबाइल वापरणार नाही!’ शाळेतील विद्यार्थ्यांचा दृढ संकल्प:नाटिकेच्या माध्यमातून मोबाइलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि मानसिक विकासावर होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, भिंगार येथे ‘मोबाइलचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा प्रभाव इतका झाला की पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी “आम्ही मोबाइल वापरणार नाही” असा संकल्प केला. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी मोबाइलच्या…

Read More