युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:'नीट' नंतर FDA परीक्षेत घोळ, कठोर कारवाईची मागणी
‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतही घोळ झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने गुरुवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद…