Headlines

Gen-Z आंदोलनात वापरले गेलेले ॲप इंटरनेटशिवाय इन्स्टॉल होईल:बिटचॅट ब्लूटूथद्वारे संदेश पाठवतो, सरकारने प्ले स्टोअरवरून काढण्यास सांगितले होते

ट्विटरचे निर्माते जॅक डोर्सी यांच्या ‘बिटचॅट’ या ऑफलाइन मेसेजिंग ॲपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर (वैशिष्ट्य) आणले आहे. यामुळे आता अँड्रॉइड वापरकर्ते इंटरनेट, गुगल प्ले स्टोअर किंवा गिटहबशिवायही हे ॲप थेट एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये शेअर आणि इन्स्टॉल करू शकतात. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली. भारत सरकारने गिटहबवरून बिटचॅट ॲप ब्लॉक…

Read More

Supreme Court Bhojshala Land Namaz Order; Dhar Madhya Pradesh Controversy

धार8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात भोजशाळेशेजारील जमीन मुस्लिम समाजाला नमाजसाठी दिली आहे. येथे दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नमाज अदा करता येईल. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, या भूखंडापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळा मार्ग आहे आणि तो वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे हे नमाजसाठी योग्य…

Read More

411 फाउंडर्स क्लब:सहा महिन्यांत 7 हजार उद्योजकांची नोंदणी, पुण्यातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योजक समुदाय

४११ फाउंडर्स क्लब हा अवघ्या सहा महिन्यांत पुण्यातील एक प्रमुख आणि वेगाने वाढणारा उद्योजक समुदाय म्हणून उदयास आला आहे. या व्यासपीठावर आतापर्यंत ७ हजारांहून अधिक उद्योजकांनी नोंदणी केली आहे. आठ विशेष ‘फाउंडर्स एडीशन्स’च्या माध्यमातून ६०० हून अधिक उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग नेते आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक एकत्र आले आहेत. देवयानी पवार आणि पवन रोचवानी यांनी उद्योजकांमध्ये…

Read More

सावनेरमध्ये भीषण अपघात:रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, रुळावरून जाताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी १०:१५ वाजता ही दुर्घटना घडली. निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७, दोघे रा. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे फिरके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….

Read More

खोटी साक्ष देण्यासाठी वकिलाचा दबाव:अपहरण करून जीवे मारण्याची धमकी, साक्षीदाराचा नागपूर न्यायालयात गौप्यस्फोट

नागपूर जिल्हा न्यायालयात एका गंभीर हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याला घरातून अपहरण करून रात्रभर डांबून ठेवल्याचे, मारहाण केल्याचे आणि खोटी साक्ष देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने न्यायाधीशांसमोर सांगितले. या कटात एका नामांकित फौजदारी वकिलाचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्या न्यायालयात साक्ष देण्यासाठी…

Read More

पुणे मनपाच्या गलथान कारभाराविरोधात शिंदेसेना आक्रमक:शिवसैनिकांचे मुख्यालयावर आंदोलन, प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी

पुणे महानगरपालिकेच्या गलथान, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने महापालिका मुख्यालयावर जनआंदोलन करण्यात आले. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रशासनाचा निषेध करत विविध घोषणा देण्यात आल्या आणि आयुक्तांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामध्ये पहिल्याच…

Read More

पिंपरीतील गाय चोरी प्रकरणी आरोपी कुर्ल्यातून अटक:सीसीटीव्ही फुटेजमुळे 'कुर्ला कनेक्शन' उघड, पुढील तपास सुरू

पिंपरी गावातून गाय चोरी करणाऱ्या टोळीचे ‘कुर्ला कनेक्शन’ उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पिंपरी पोलिसांनी मुंबईतील कुर्ला येथून एका आरोपीला अटक केली आहे. कादिर अन्सारी (रा. कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अभिजित ज्ञानेश्वर शिंदे (वय ३७, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार, तीन…

Read More

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात छेडछाडीचा आरोप केला होता

जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी प्रल्हाद जोशी यांना नवीन शिक्षणमंत्री बनवणे एक विनोद असल्याचे म्हटले. यशस्वी राजे यूपीच्या फतेहपूरमधून भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांच्या कन्या आहेत. त्या एक मॉडेल आहेत आणि दिल्लीत राहतात. त्यांनी हे मुद्दे…

Read More

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न:तानाजी सावंतांच्या पीएवर गंभीर आरोप, तळहातावर सुसाईड नोट लिहिली

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटस, व्हिडिओ संदेश आणि तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून माजी तानाजी सावंत यांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री…

Read More

टीएमसीच्या बंडखोर खासदारांचे पोस्टर घेऊन कल्याण बॅनर्जी संसदेत पोहोचले:प्रियंका गांधी यांच्याशी संवाद, म्हणाले – पहिली निवडणूक काँग्रेसमधूनच जिंकलो

TMC खासदार कल्याण बॅनर्जी गुरुवारी पक्षाच्या 20 बंडखोर खासदारांचे पोस्टर गळ्यात घालून संसद भवनात पोहोचले. यावेळी त्यांनी प्रियंका गांधींसह अनेक विरोधी खासदारांशी संवाद साधला. प्रियंका गांधींनी पोस्टरकडे बोट दाखवत विचारले की, ‘मागेही हेच आहे का?’, यावर कल्याण बॅनर्जींनी ‘हो’ असे उत्तर दिले. यानंतर प्रियंका यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, ‘मी माझी पहिली निवडणूक काँग्रेसमधूनच लढलो…

Read More