माणसं मेल्यावर सरकार दात काढून निर्लज्जपणे हसतेय:104 टक्के नालेसफाईचा दावा फोल, मुंबई तुंबली अन् कमिशन कोणाचे? संजय राऊतांचा सवाल
मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली आहे. ‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळेच या दोघांना…