Headlines

टँकरमुक्तीसाठी करंदीत प्रथमच बोअर ब्लास्टिंग:पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढणार, दहा बोअरमध्ये एकाच दिवशी स्फोट‎

नेहमीच टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर तालुक्यातील करंदी गावांत टँकरमुक्तीसाठी ग्रामपंचायतीने बोअर ब्लास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तलावाजवळ असूनही, जलस्त्रोत असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमी असल्याचे दिसून आले. तलावाच्या पाणीपातळीप्रमाणे विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी, रविवारी १० बोअरमध्ये स्फोट घडवण्यात आले. करंदी हे टंचाईग्रस्त गाव असून, या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने…

Read More

MPSC Drug Inspector Exam Controversy; Candidates Demand Probe

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोशल मीडियावर फिरल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसे . व्हॉट्सॲपवर प्रश्न फिरल्याचा दावा तक्रारीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती….

Read More

विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट करून अभिनेत्री वादात:पर्ल मानेचे 2 दिवसांत 3 लाख इंस्टा फॉलोअर्स घटले; लिहिले होते- कोणताही मुद्दा जीवापेक्षा मोठा नाही

बिग बॉस मल्याळम 1 ची स्पर्धक तथा अभिनेत्री पर्ल माने विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट लिहून वादात सापडली आहे. सोशल मीडियावर विरोध वाढल्यानंतर, पर्ल मानेचे दोन दिवसांत 3 लाखांहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाले आहेत. कमेंट सेक्शन बंद केल्यानंतर हा वाद आणखी वाढला. ‘जीवनापेक्षा मोठा कोणताही मुद्दा नाही’ पर्ल मानेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांब पोस्ट शेअर…

Read More

मीटरची सरासरी किंमत 20 हजार रुपये:10 ते 15 लाख शेतकऱ्यांना मीटरने पाणी; 2 हजार 250 काेटींचा बाेजा, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची शिफारस

धरण, नदी यासह अन्य जलाशयातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 10 टक्क्यापर्यंत वाढ करण्यापाठोपाठ आता या पाण्याचे मोजमाप मीटरद्वारे करण्याची शिफारस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केली आहे. आता त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जलसंपदा विभागावर आली आहे. मीटर बसवल्याने आर्थिक बोजा पडेल, असे कारण सांगून त्याला विरोध होऊ लागला आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्याला 10 ते…

Read More

इमामपूर, वांबोरी घाटात पावसाळ्यात दरडींचे अडथळे:दगड व सिमेंटचे अस्तरीकरण रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता, उपाययोजना शून्य‎

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट आणि अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण घाट सध्या धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात डोंगरावरील दगड व सिमेंटचे अस्तरीकरण उखडून थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सुद . यामुळे महामार्गाच्या एका पट्ट्यात मोठे दगड येऊन पडतात. सुदैवाने या दरडींखाली सापडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली…

Read More

मंगळवेढ्यात सापडला “सिवाजी’नावाचा दुर्मिळ शिलालेख:छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंगळवेढा भेटीच्या ऐतिहासिक नोंदीला नवा आधार‎

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. नुकताच मंगळवेढ्यातील माऊली मंदिरामध्ये “सिवाजी” नावाचा दुर्मिळ शिलालेख आढळून आल्याने या इतिहासाला न . इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानंतर मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाहीची राजधानी विजापूर जिंकण्यासाठी संयुक्त मोहीम आखण्यात आली होती. या…

Read More

कौंडण्यपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानला प्रथम क्रमांक:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार2026'' प्रदान‎

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. शतकानुशतकांची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारामध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थानला एक…

Read More

2500 दाखल्यांचे वितरण‎:अमरावतीच्या शाश्वत विकासावर अजित पवारांची छाप- आमदार संजय खोडके

प्रतिनिधी | अमरावती सरकारमध्ये राहून लोकनेते अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरवली, ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. या मतदारसंघाच्या विकासासाठी दादांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरिता भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळेच अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून…

Read More

मी आई-वडिलांचा पुरावा कुठून आणू?:अनाथ तरुणांच्या मतदार नोंदणीचा प्रश्न, रोहित पवारांचे सरकारला थेट आवाहन

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या अनाथ तरुणांना ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा नसल्याने मतदार यादीत नाव नोंदवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. पुण्यातील ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ने या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून,…

Read More

तरुणाईच्या एकजुटीपुढे हिटलरशाही झुकली:उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची केंद्र सरकारवर जहरी टीका‎

परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात जेन झीने आंदोलन केले. तरुणाईच्या एकजुटीपुढे ही हिटलरशाही झुकली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. भारतात लोक नव्हे, तर झुरळे राहतात, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांशी वागत आहेत. मात्र तरुणाईच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीप्रकरणी देशभर उसळलेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री…

Read More