Headlines

जायखेडा विद्यालयामध्ये ईव्हीएमवर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक:अधिकृत निकालातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव‎

लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. मतदान केंद्र, मतदार यादी, ईव्हीएमद्वारे मतदान, मोबाईल ॲपचा वापर, मतमोजणीच्या फेऱ्या आणि अधिकृत निकाल घोषणेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. पी. शेवाळे आणि सहाय्यक निवडणूक…

Read More

चांदवडला बाजारतळ गाळ्यांचा लिलाव रद्द करा:विस्थापितांचे नाममात्र भाडेतत्त्वावर पुनर्वसन करावे; श्रमशक्ती हॉकर्स सेलचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

शहरातील बाजारतळात नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा ऑनलाईन लिलाव रद्द करून ते पात्र हॉकर्सना प्राधान्याने नाममात्र भाडेतत्त्वावर वाटप करावेत, तसेच विस्थापित टपरीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉक . २८ फेब्रुवारी २०२५ रोजी चांदवड नगरपरिषदेने बाजारतळ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या कारवाईपूर्वी सर्व नोंदणीकृत हॉकर्स व टपरीधारकांनी ‘प्रथम पर्यायी…

Read More

कळवणला आश्रमशाळांमध्ये 325 पदे रिक्त:विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, रिक्त पदे त्वरित न भरल्यास आंदोलन, परिवर्तन कामगार सेनेचा इशारा‎

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल ३२५ पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था विस्कळीत झाली असून विद्यार्थ . आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळाच शिक्षणाचा मुख्य आधार आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक विषयांचे नियमित अध्यापन होत नसून काही ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक…

Read More

गंज बाजार पोलिस चौकी बंद असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत असुरक्षिता:चौकी ठराविक कालावधीत तरी सुरु ठेवण्याची मागणी‎

शहरातील गंज बाजार आणि परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाला आहे. येथील व्यावसायिक दुकाने, नागरी वसाहती आणि परिणामी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, याच मुख्य बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गंज बाजार पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आहे. ही चौकी बंद असल्याने संपूर्ण परिसरात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read More

बारामतीतील सुपे येथे भीषण अपघात:दुचाकी घसरून ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावर रविवारी दुपारी एका मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एकाच घरातील दोन तरुण मुलांचा बळी गेल्याने संपूर्ण बारामती तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी हे दोन्ही भाऊ…

Read More

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा…

Read More

अकोले तालुक्याला पावसाचा तडाखा:धरणे ओसंडली, 52 घरांचे मोठे नुकसान, सर्व धरणे तुडुंब भरून सांडव्यावरून ओसंडून वाहताहेत, पांजरे शिवारात भूस्खलन‎

अकोले तालुक्यात गेल्या सुमारे आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. यामुळे भातखाचरांमधील लागवडी अंतिम टप्प्यात आल्या असून खरीप पिकांना जोरदार बळ मिळाले आहे. मात्र, मुसळधारेमुळे तालुक्यातील ५२ घरांचे नुकसान झाले. पांजरे शिवारात भूस्खलनाची घटना घडली आहे. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात तालुक्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे: भंडारदरा धरण: धरण ९१.५७ टक्के…

Read More

विठूरायाच्या जयघोषाने दुमदुमला शाळेचा परिसर:बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत, विद्यार्थ्यांची उपस्थिती‎

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांची दिमाखदार उंचावलेली पताका आणि “जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड…

Read More

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवणे महत्वाचे:अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांचे प्रतिपादन‎

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Read More

Sensex Nifty Market Update; FMCG and IT Shares Rally Amid Strong Buying

मुंबई17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २७ जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७६,६०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही १५० अंकांची वाढ झाली असून, तो २३,९५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एफएमसीजी, आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. कच्च्या तेलाची किंमत ९३ डॉलरवर आज ब्रेंट…

Read More